Home Breaking News हर्षवर्धन पाटील यांचा पक्षप्रवेश ७ ऑक्टोबर रोजी तारीख निश्चित

हर्षवर्धन पाटील यांचा पक्षप्रवेश ७ ऑक्टोबर रोजी तारीख निश्चित

49
0

पुणे दिनांक ४ ऑक्टोबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) राज्याचे माजी मंत्री तसेच पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्याचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी आज इंदापूर येथे कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन पत्रकार परिषदेत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.दरम्यान पाटील हे केव्हा शरद पवार गटांमध्ये जाणार याबाबत शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्विट करत माहिती दिली आहे.जेष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत इंदापूर येथे दिनांक ७ ऑक्टोबर सोमवारी सकाळी १० वाजता त्यांचा पक्ष प्रवेश होईल असे जयंत पाटील यांनी सांगितले आहे.तसेच त्यांनी हर्षवर्धन पाटील यांच्या निर्णयाचे स्वागत देखील केले आहे.

Previous articleभारतीय क्रिकेटपटूंच्या आईचा पुण्यात संशयास्पद मृत्यूने एकच खळबळ
Next articleमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले एकविरा देवीचे दर्शन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here