Home Breaking News अमरावतीत मध्यरात्रीच्या वेळी मोठा तणाव, जमावाने पोलिस स्टेशन फोडलं दगडफेकीत २९ पोलिस...

अमरावतीत मध्यरात्रीच्या वेळी मोठा तणाव, जमावाने पोलिस स्टेशन फोडलं दगडफेकीत २९ पोलिस जखमी पोलिसांनी फोडल्या अश्रु धुराच्या नळकांड्या

152
0

पुणे दिनांक ५ ऑक्टोबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच एक मोठी अपडेट अमरावती येथून येत आहे.उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील दासना देवी मंदिराच्या विश्वस्त सरस्वती यांच्या वक्तव्याचे पडसाद अमरावतीत उमटले दरम्यान त्यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करा अशी मागणी करत शुक्रवारी रात्रीच्या सुमारास मोठा जमाव नागपुरी गेट पोलिस स्टेशनवर चालून गेला . यावेळी पोलिसांनी 👮 या जमावाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.मात्र संतप्त झालेल्या जमावाने थेट पोलिस स्टेशनवरच हल्ला केला.त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणावर तणाव निर्माण झाला.जमावाने पोलिस स्टेशनची तोडफोड सह जाळपोळ देखील केल्याची माहिती सूत्रांनद्वारे मिळत आहे.दरम्यान यावेळी पोलिसांनी 👮 अश्रू धुराच्या नळकांड्या फोडल्या यावेळी जमावाकडून करण्यात आलेल्या दगडफेक मध्ये २९ पोलिस कर्मचारी हे जखमी झाले आहेत.दरम्यान रात्री एक वाजता सदरची परिस्थिती नियंत्रणात आली आहे. आता या परिसरात तणावपूर्ण शांतता आहे.

आज नागपुरी गेट पोलिस स्टेशनच्या हद्दीत कलम १४४ अंतर्गत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. परिसरात कडेकोट असा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान रात्रीच्या वेळी पोलिसा वर दगडफेक करणा-या आरोपींचा शोध पोलिस घेत आहेत.दरम्यान यती नरसिंह नंद सरस्वती यांनी २९ सप्टेंबर रोजी गाझियाबाद येथे बोलताना एका विशिष्ट समाजाच्या धर्मीयांविरुध्द आक्षेपार्ह वक्तव्य केले होते त्यामुळे त्यांच्या विरोधात तातडीने गुन्हा दाखल करण्यात यावा अशा मागणी साठी अंदाजे ४०० ते ५०० लोकांचा एक मोठा जमाव शुक्रवारी रात्रीच्या सुमारास नागपुरी गेट पोलिस स्टेशनवर चालून आला. यावेळी पोलिसांनी या जमावाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.या काही जणांनी बाचाबाची केली.व पोलिस स्टेशनची तोडफोड सुरू केली.दरम्यान तणावाची परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांच्या वतीने अश्रु धुराच्या नळकांड्या फोडल्या यावेळी संतप्त झालेल्या जमावाने दगडफेक सुरू केली.या दगडफेकीत एकूण २९ पोलिस कर्मचारी हे जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Previous articleपंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौ-यावर
Next articleराहुल गांधींचा आज कोल्हापूर दौरा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here