पुणे दिनांक ५ ऑक्टोबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाचे सोलापूर जिल्ह्यातील माढ्याचे विद्यमान आमदार बबन शिंदे यांनी देखील आता अजित पवार यांची साथ सोडणार असल्याचे आता निश्चित झाले आहे.ते मागील सहा टर्म मागण्यांचे आमदार आहेत तसेच मागील ३७ वर्षांपासून जेष्ठ नेते शरद पवार यांच्या बरोबर आहेत.पण अजित पवार यांनी वेगळा घरोबा केल्यानंतर ते अजित पवार यांच्या बरोबर गेले होते.पण आता त्यांना माढा विधानसभा निवडणुकीत त्यांच्या मुलाला उतरवणार आहेत.तसेच त्यांनी जेष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली आहे.व आपल्या मुलाला शरद पवार गटातूनच तिकीटाची मागणी त्यांनी केली आहे.जर त्यांना तिकीट न दिल्यास ते त्यांच्या मुलाला भांड्यातून अपक्ष लढण्याची देखील तयारी त्यांनी यावेळी केली आहे.दरम्यान महायुतीचे तिकीट फिक्स असताना का नाकारता? यावर आमदार बबन शिंदे यांनी ‘तो विषय आता संपलेला आहे, असे म्हणत एका वाक्यात उत्तर दिले आहे.व अजित पवार यांच्या सह महायुतीला जय महाराष्ट्र केला आहे.