पुणे दिनांक ५ ऑक्टोबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता बरेच नेते मंडळी या पक्षातून त्या पक्षात जात आहेत. दरम्यान कालच भारतीय जनता पार्टीचे नेते व माजी मंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कट्टर समर्थक हर्षवर्धन पाटील यांनी जेष्ठ नेते शरद पवार यांच्या गटात प्रवेश केला आहे. ते दिनांक ७ ऑक्टोबर रोजी इंदापूरात जेष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत हातात तुतारी घेऊन पक्ष प्रवेश करणार आहेत.
दरम्यान आता अशातच रामराजे निंबाळकर हे थोरल्या पवारांच्या गटात सहभागी होऊन हाती तुतारी घेणार अशी अधिकृत सूत्रांनद्वारे माहिती मिळत आहे.दरम्यान हा धाकट्या पवारांना एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे.दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटातील जेष्ठ नेते आणि विधान परिषदे चे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर हे आता शरद पवार यांच्या गटात जाणार आहे असे समजत आहे.दरम्यान या बाबत आजच रामराजे निंबाळकर यांच्याकडून महत्वपूर्ण निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.दरम्यान जेष्ठ नेते शरद पवार यांनी कालच भारतीय जनता पक्षाला हर्षवर्धन पाटील यांच्या रूपाने चांगलाच दणका दिला आहे.तसेच आता पुणे जिल्ह्यातील अजून एक मोठे नेते व माजी आमदार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक रमेश थोरात हे देखील जेष्ठ नेते शरद पवार यांच्या गटात सहभागी होणार असल्याची माहिती सूत्रांनद्वारे मिळत आहे. दरम्यान असं झाल्यास उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर धक्का बसण्याची शक्यता आहे.दरम्यान आता जेष्ठ नेते शरद पवार यांच्या गटात अनेक मान्यवर नेते मंडळी सहभागी होताना दिसत आहे.