पुणे दिनांक ५ ऑक्टोबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) महायुतीत सन्मानजनक जागा न मिळाल्यास महायुतीमधील उपमुख्यमंत्री अजित पवार हे महायुती मधून बाहेर पडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.दरम्यान विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या गटाला महायुतीत ८० ते ८५ जागांची मागणी त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या जेष्ठ नेत्यांना केली आहे.दरम्यान एवढ्या जागा न मिळाल्यास अजित पवार यांनी स्वबळावर लढण्याची तयारी असल्याचेही बोलले जात आहे.दरम्यान लोकसभा प्रमाणे विधानसभा मध्ये देखील कमी जागा दिल्यास ते महायुती मधून बाहेर पडण्याची अजित पवार यांची भूमिका असल्याची माहिती सूत्रांनद्वारे मिळत आहे.