पुणे दिनांक ५ ऑक्टोबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच आहिल्यानगर येथून एक खळबळ जनक अपडेट हाती आली आहे.दरम्यान आहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेत धक्कादायक प्रकार घडला आहे.तिसरीच्या वर्गात शिकणाऱ्या तब्बल पाच मुलीं चा एका शिक्षकाने विनयभंग केल्याची धक्कादायक व खळबळजनक घटना घडली आहे.दरम्यान दुपारी शाळेच्या सुट्टीत एक मुलगी रडत रडतच घरी गेली आणि घडलेला प्रकार पालकांना सांगितल्या नंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे.दरम्यान या नंतर पालकांनी शाळेच्या प्रशासनाला धारेवर धरले नंतर सदर शिक्षकावर शाळेच्या प्रशासनाच्या वतीने कडक कारवाईची मागणी केली आहे.दरम्यान या शिक्षकाचे नाव बाळशीराम बांबळे असं नाव आहे.दरम्यान या घटनेनंतर संगमनेर तालुका मध्ये एकच खळबळ उडाली असून पालकांमध्ये आता भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.आपल्या मुली शाळेत गेल्यावर खरंच सुरक्षित आहे का.आता यांची चिंता पालकवर्गा समोर आहे.