Home Breaking News ‘तुमच्या दोन्ही हातावर खून आहेत ‘खासदार सुप्रिया सुळे यांची टिका

‘तुमच्या दोन्ही हातावर खून आहेत ‘खासदार सुप्रिया सुळे यांची टिका

79
0

पुणे दिनांक ६ ऑक्टोबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) महाराष्ट्रातील विधान सभा निवडणुका जशा जवळ आल्या आहेत तशी आता टिका टिप्पणी सत्ताधारी महायुती मधील आमदारांवर पुण्यात मोठ्या प्रमाणावर सुरू झाली आहे.जेष्ठ नेते शरद पवार यांनी या आधी पुण्यातील वडगावशेरीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार सुनील टिंगरे यांच्यावर वडगावशेरी मध्ये भर सभेत पुण्यातील कार अपघात प्रकरणी टीका केली होती.त्यांच्या नंतर आता बारामती लोकसभा मतदारसंघा मधील खासदार सुप्रिया सुळे यांनी आज   राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे व अजित पवार गटाचे वडगावशेरी मतदार संघाचे आमदार सुनील टिंगरे यांच्यावर टीका केली आहे.यावेळी पुण्यात बोलताना सुळे म्हणाल्या की कुठल्या तोंडाने मतं मागणार आहात.तुमच्या दोन्ही हातावर खून आहेत,हा माझा आरोप आहे. कार अपघातात दोन जणांचा जीव गेला आहे. त्यांच्या आईच्या दुःखाचा कधी विचार केलाय का? त्यांच्या आईला काय वाटत असेल?  दरम्यान त्यांच्याकडे मोठी गाडी आहे.म्हणून त्यांची बाजू घेता.असे खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

Previous articleशिवसेना मंत्री अब्दुल सत्तारांनी केलेल्या साड्या वाटपाची संतप्त महिलांनी केली होळी
Next article‘अरे बापाशी भिडा ना, लहान मुलांशी काय भिडताय, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here