पुणे दिनांक ७ ऑक्टोबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच एक खळबळ जनक अपडेट ही अकोला येथून आली आहे. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार अकोल्यात दोन गटात तुफान राडा झाला आहे.यात जमावाने तुफान दगड फेक करुन जाळपोळ केली आहे.यात संतप्त झालेल्या जमावाने काही चारचाकी गाड्या जाळल्या आहेत.अशी माहिती मिळत आहे. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत.
दरम्यान या प्रकरणी प्रथमदर्शनी मिळालेल्या माहितीनुसार एका ऑटो रिक्षाला दुचाकीची धक्का लागल्यानंतर दोघांमध्ये प्रथम वाद झाला . त्यानंतर दोन्ही बाजूचे दोन गट एकामेकांच्या आमनेसामने आले.आणी त्यांनी यावेळी तुफान दगडफेक केली.व अन्य वाहनां ची जाळपोळ केली यात काहीजण जखमी झाले आहेत.दरम्यान घटनास्थळी पोलिस पोहोचले असून सध्या तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.