पुणे दिनांक ७ ऑक्टोबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुण्यातील बोपदेव घाटात ३ ऑक्टोबर रात्री ११च्या सुमारास तिच्या मित्राचे हातपाय बांधून तीन जणांनी सामुहिक बलात्कार तरुणीवर करण्यात आला होता.या घटनेनंतर पुण्यात एकच खळबळ उडाली होती.दरम्यान पुणे पोलिसांची एकूण १० टीम यातील फरार आरोपींचा शोध घेत आहेत.घटना घडून ४ दिवस होऊन देखील पुणे पोलिसांना यातील आरोपी सापडले नाहीत आता या घटनेतील आरोपींवर १० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. अशी माहिती पोलिस सहआयुक्त रंजन कुमार शर्मा यांनी दिली आहे.
दरम्यान दिनांक ३ ऑक्टोबर रोजी शुक्रवारी एक तरुणी ही तिच्या मित्राबरोबर पुण्यातील बोपदेव घाटात रात्रीच्या वेळी फिरायला गेली होती.दरम्यान रात्रीच्या वेळी दुव्हीलर वरुन आलेल्या तीन जणांनी तिच्या मित्राला ब्रेट व त्यांच्याच शर्टाच्या सहाय्याने त्याला बांधून या मुलीवर गँगरेप केला होता आणि.त्यानंतर हे आरोपी फरार झाले आहेत.दरम्यान या बाबत कोंढवा पोलिस स्टेशन मध्ये तीन जणांवर बलात्कार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान या गुन्ह्यानंतर विरोधकांनी महायुतीच्या सरकारवर टीका केली आहे.तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील टीका केली आहे.दरम्यान पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी घटनास्थळी जाऊन स्वता पाहाणी केली.तसेच या आरोपींच्या शोधा करीता तब्बल १० पोलिस पथक तयार केले आहे.आज या घटनेला ४ दिवस होऊन देखील सदरचे गुन्हेगार हे पोलिसांच्या टीमला सापडले नाहीत दरम्यान विरोधकांनी सरकार व पुणे पोलिसांच्या पुण्यातील सुरक्षा बाबत मोठ्या प्रमाणावर टिका केली आहे.व सुरू आहे.तसेच वरुन गृहमंत्री यांचा देखील दबाव पुणे पोलिसा वर आहे.मात्र या घटनेतील आरोपी मात्र पुणे पोलिसांना सापडत नाही.या प्रकरणी पुणे पोलिसांनी २०० पेक्षा जास्त जणांची चौकशी केली आहे.तसेच एकूण ३ हजार मोबाईल धारकांची माहिती मिळवण्यात आली आहे. तसेच बोपदेव घाटातील घटनेनंतर आरोपी हे सासवडच्या दिशेने पुढे गेले असल्याचे सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज देखील पोलिसांना मिळाल्यानंतर देखील आरोपी पोलिसांना सापडत नाहीत पुणे पोलिसांच्या टीमा सर्वत्र फिरत आहेत.तरी हे आरोपी मात्र फरार आहेत. या बाबत आता पोलिसांनी या घटनेतील आरोपी यांच्यावर तब्बल १० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.तसेच या आरोपींची माहिती देणा-यांना हे बक्षीस देण्यात येणार आहे.अशी माहिती पोलिस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी दिली आहे.