Home Breaking News माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील हे आज इंदापूरात तुतारी हाती घेणार

माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील हे आज इंदापूरात तुतारी हाती घेणार

207
0

पुणे दिनांक ७ ऑक्टोबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आज एक पुणे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळातील एक मोठी अपडेट नुसार.भारतीय जनता पार्टीला जय महाराष्ट्र केल्यानंतर राज्याचे माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील हे आज पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथे त्यांच्या होमपीचवर आज जेष्ठ नेते शरद पवार यांच्या गटात प्रवेश करणार आहेत. त्यांच्या सोबत त्यांच्या कन्या अंकिता पाटील या देखील तुतारी हाती घेतील.दरम्यान सदरचा कार्यक्रम इंदापूर शहरातील जुन्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर आज भव्य असे प्रवेश सोळाळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.सदर कार्यक्रमाला जेष्ठ नेते शरद पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे तसेच अन्य नेते मंडळी हे हजेरी लावणार आहेत.दरम्यान या नेत्यांच्या उपस्थितीत तसेच हजारो कार्यकर्ते तसेच समर्थकांचा उपस्थितीत आजचा पक्षप्रवेश पार पडणार आहे.दरम्यान हर्षवर्धन पाटील हे इंदापूर विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार आहेत.

Previous articleमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मध्यरात्री तातडीने दिल्ली दरबारी
Next articleअकोल्यात दोन गटात तुफान राडा, जमावाने दगडफेक करून कार पेटवल्यानंतर वाढला तणाव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here