Home Breaking News काॅग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते थोपटे यांना अपशब्द वापरल्याने भोरमध्ये तणाव

काॅग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते थोपटे यांना अपशब्द वापरल्याने भोरमध्ये तणाव

375
0

पुणे दिनांक ७ ऑक्टोबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) काॅग्रेस पक्षाचे पुणे जिल्ह्यातील सर्वात जेष्ठ नेते व माजी आमदार अनंतराव थोपटे यांच्या बद्दल अपशब्द वापरल्याने दिनांक ६ ऑक्टोबर रविवारी पुण्यातील भोर तालुक्यातील भोर पोलिस स्टेशन बाहेर हजारो काॅग्रेस समर्थक व कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडला होता.तसेच थोपटे यांच्या बद्दल अपशब्द वापरण्यांवर कारवाई करण्याची मागणी केली.दरम्यान भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक किरण दगडे पाटिल यांच्या एका कार्यकर्त्याने भोर येथील एका कार्यक्रमात आमदार संग्राम थोपटे व माजी आमदार तसेच काॅग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अनंत राव थोपटे यांच्या बद्दल अपशब्द वापरले.याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्या नंतर भोर मध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.

Previous articleपुणे बोपदेव घाटात तरुणीवर बलात्कार, आरोपीवर १० लाखांचे बक्षीस जाहीर अद्याप आरोपी फरार
Next articleमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मध्यरात्री तातडीने दिल्ली दरबारी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here