Home Breaking News मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मध्यरात्री तातडीने दिल्ली दरबारी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मध्यरात्री तातडीने दिल्ली दरबारी

353
0

पुणे दिनांक ७ ऑक्टोबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच राजकीय वर्तुळातून एक मोठी अपडेट हाती आली असून.राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काल रविवारी रात्रीच्या सुमारास तातडीने दिल्ली दरबारी गेले आहेत.दरम्यान दिल्ली येथे नक्षल ग्रस्त राज्यातील मुख्यमंत्र्यांची आज सोमवारी केंद्रीय गृहमंत्रालयाकडून बैठक आयोजित करण्यात आली आहे.यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीला गेले आहेत.सकाळी १० वाजता दिल्लीतील विज्ञान भवनात ही बैठक आयोजित करण्यात आली आहे.यात प्रत्येक राज्यातील नक्षलवाद्यांना रोखण्यासाठी अनेक योजनांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांशी राज्यातील विधानसभा निवडणुकीवर देखील चर्चा करण्या ची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Previous articleकाॅग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते थोपटे यांना अपशब्द वापरल्याने भोरमध्ये तणाव
Next articleमाजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील हे आज इंदापूरात तुतारी हाती घेणार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here