पुणे दिनांक ८ ऑक्टोबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) विधानसभा निवडणुकी च्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू होण्या पूर्वी राज्य मंत्रिमंडळाची आज पुन्हा बैठक होणार असल्याची माहिती सूत्रांनद्वारे मिळत आहे.दरम्यान ही बैठक मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात आज मंगळवारी दुपारी ४ .३० वाजता पार पडणार आहे.दरम्यान आज जम्मू काश्मीर व हरियाणा विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहे.आजच्या या निकाल नंतर याच आठवड्यात महाराष्ट्रात कधीही आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे.त्या मुळे महायुती सरकारच्या वतीने प्रत्येक आठवड्याला दोन ते तीन वेळा मंत्रीमंडळाच्या बैठकी होत आहेत.आणि बैठकीत धडाधड महत्वपूर्ण निर्णय घेण्यात येत आहे.दरम्यान आजच्या कॅबिनेट मंत्रीमंडळाच्या बैठकीत काय निर्णय घेतले जातात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.