पुणे दिनांक ८ ऑक्टोबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच राजकीय वर्तुळातून एक अपडेट हाती आली असून आज हरियाणा व जम्मू -काश्मीर मध्ये विधानसभेचे निवडणुकीचे निकाल लागले आहेत.दरम्यान दिनांक ११ ऑक्टोबर गुरुवार पासून महाराष्ट्रा मध्ये केव्हाही आचारसंहिता लागू होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.दरम्यान निवडणूक आयोगाच्या वतीने केव्हाही पत्रकार परिषद होऊन आचारसंहिता लागू करण्याची शक्यता आहे.त्यामुळे आता गुरुवारपर्यंत दिनांक ११ ऑक्टोबरपर्यंत सर्व शासकीय कामे उरकून घेण्याचे आदेश देण्यात आले आहे.तसेच प्रशासकीय पातळीवरव विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता लगबग वाढली आहे.दरम्यान आता हरियाणा व जम्मू -काश्मीर निवडणूकीचा कार्यक्रम संपला आहे.तसेच हरियाणा राज्यात विजायादशमीच्या दिवशी मुख्यमंत्री पदाची शपथ सोहळ्याचा कार्यक्रम होवू शकतो.त्या मुळे महाराष्ट्रात आता विधानसभेच्या निवडणुकीचे पडघम केव्हाही वाजू शकतात.