पुणे दिनांक ८ ऑक्टोबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आज सकाळीच एक अपडेट मुंबई मधून आली असून.मुंबईत आज सकाळीच मध्यरेल्वेची वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे.दरम्यान सूत्रांनद्वारे मिळालेल्या माहितीनुसार दिवा आणि कोपर रेल्वे स्टेशन दरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने ही वाहतूक विस्कळित झाली आहे.यामुळे ठाण्यावरुन कल्याणकडे जाणाऱ्या लोकल वाहतूकीच्या तीन तेरा वाजल्या आहेत.दरम्यान यामुळे १५ ते २० मिनिटांनी उशिराने लोकल वाहतूक सुरू आहे.दरम्यान सकाळी कामावर जाणाऱ्या प्रवाशांना याचा फटका बसला आहे. दरम्यान रेल्वेच्या वतीने तुटलेली ओव्हर हेड वायर दुरुस्त करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.असे रेल्वे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.