पुणे दिनांक ९ ऑक्टोबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुण्यातून अपघाताची एक खळबळजनक अपडेट हाती आली असून. कोथरूड येथे एक भीषण अपघात झाला आहे. कामावर जाताना रस्ता ओलांडताना एका युवतीला सिमेंट मिक्सर डंपरने उडवले आहे. दरम्यान या अपघातात सदरची युवती खाली पडल्यानंतर तिच्या डोक्यावरुन मिक्सर डंपरचे चाक गेल्याने या अपघातात या युवतीता घटना स्थळीच मृत्यू झाला आहे.दरम्यान या अपघात मध्ये ठार झालेली युवती ही मुळ रहाणारी अमरावतीची होती.ती कामानिमित्ताने पुण्यात राहत होती.तसेच ती पुण्यातील एका नामांकित कंपनीत काम करत होती . दरम्यान सकाळी घाईगडबडीत कामाला जात असताना कोथरूड येथील स्टॅंडसमोरील सिग्नल ओलांडत असताना पाठीमागून भरघाव वेगाने येणाऱ्या मिक्सर डंपरने तिला चिरडले आहे. दरम्यान या अपघाताबाबत कोथरूड पोलिस यांनी या सिमेंट मिक्सर डंपरच्या चालकाला अटक केली आहे.