पुणे दिनांक १० ऑक्टोबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच एक खळबळ जनक अपडेट ही अमेरिका मधून येत असून अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांनी ‘ द लेट शो विथ स्टीफन कोलबर्ट ‘ या शोमध्ये नुकतीच हजेरी लावली होती.यावेळी त्यांनी चक्क बियरचे सेवन केले.तसेच फेसबुकवर याचा व्हिडिओ देखील शेयर केला आहे.गेल्या वेळी माझा पती डग एम्हाॅफसोबत बेसबॉल खेळताना बियर प्यायली होती.असे देखील कमला हॅरिस यांनी सांगितले.दरम्यान हॅरिस या अमेरिकेत राष्ट्रपतीपदाच्या निवडणूकीत डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार आहेत.दरम्यान त्यांची लढत डोनाल्ड ट्रम्प यांच्या सोबत आहे.