Home Breaking News भाजपचे आमदार मुटकुळेंची प्रकृती खालावली एअर अम्ब्यूॅलन्सने मुंबईला आणणार

भाजपचे आमदार मुटकुळेंची प्रकृती खालावली एअर अम्ब्यूॅलन्सने मुंबईला आणणार

136
0

पुणे दिनांक १० ऑक्टोबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) भारतीय जनता पार्टीचे आमदार तानाजी मुटकुळे यांची प्रकृती खालावली असून त्यांना नांदेड येथून एअर अम्ब्यूॅलन्सने मुंबईला आणण्यात येत आहे. दरम्यान काहीच दिवसांपूर्वीच त्यांच्यावर अॅनजीओग्राफी झाली आहे.त्यांना अचानक पणे श्र्वास घेण्यासाठी त्रास व्हायला लागला त्यामुळे त्यांना उपचारासाठी तातडीने मुंबईकडे हलवण्यात येत आहे.

दरम्यान या प्रकरणी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार भारतीय जनता पार्टीचे हिंगोली चे आमदार तानाजी मुटकुळे यांना श्र्वास घेण्या सा त्रास होत असल्याने त्यांची तब्येत खालावली आहे.तसेच प्रकृती चिंताजनक आहे.त्यामुळे त्यांना उपचारासाठी नांदेड वरुन एअर अम्ब्यूॅलन्सने मुंबईला आणण्यात येत आहे.दरम्यान त्यांच्यावर काही दिवसांपूर्वीच अॅनजीओग्राफी करण्यात आली आहे.त्या नंतर आज अचानकपणे त्यांची प्रकृती खालावली आहे.ते विधानसभा निवडणुकी साठी तयारी सुरू करत होते.दरम्यान यावेळी ते त्यांच्या मुलाला हिंगोली येथून विधानसभा साठी निवडणूकीच्या मैदानात उतरविण्यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत.मात्र अचानकपणे त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना तातडीने उपचारा करीता मुंबई कडे हलविण्यात आले आहे.

Previous articleउद्योगपती रतन टाटा यांचे निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Next articleकमला हॅरिसने मुलाखत सुरू असताना केले बियरचे सेवन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here