पुणे दिनांक १० ऑक्टोबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच एक राजकीय वर्तुळातून खळबळजनक अपडेट हाती आली असून.राज्यात सध्या सुरू असलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनांबाबत चक्क मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या महायुतीच्या सरकारच्या प्रमुखांनाच नोटीस बजावण्यात आली आहे.दरम्यान जेष्ठ पत्रकार विनय हर्डीकर यांनी वकिल असीम सरोदे यांच्या वतीने ही नोटीस पाठवली आहे.त्यामुळे आता राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.दरम्यान मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना चा हेतू राजकीयदृष्ट्या प्रेरीत असल्याचे पत्रकार विनय हर्डीकर यांनी म्हटले आहे.विनय हर्डीकर हे एक जेष्ठ पत्रकार व राजकीय विश्लेषक आहेत.दरम्यान पत्रकार हर्डीकर यांच्या या नोटीसला मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री काय उत्तर देणार हे पहावे लागेल.