Home Breaking News पुण्यातील कोरेगावपार्क मध्ये पून्हा हीट अॅड रनची घटना,ऑडी कार चालकाने दुचाकीस्वाराला चिरडले

पुण्यातील कोरेगावपार्क मध्ये पून्हा हीट अॅड रनची घटना,ऑडी कार चालकाने दुचाकीस्वाराला चिरडले

55
0

पुणे दिनांक ११ ऑक्टोबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक पुणे येथून खळबळजनक अपडेट हाती आली असून पुण्यातील कोरेगाव पार्क येथे एक ऑडी कार चालकाने दुचाकीस्वाराला चिरडले असून यात एकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे. दरम्यान या अपघाताबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार.मध्यरात्रीच्या सुमारास एक वाजता ही घटना घडली आहे. अपघातानंतर कार चालक पळून गेला होता. पोलिसांनी 👮 त्याला अटक केली आहे.

रात्री एक वाजण्याच्या सुमारास एबीसी रोड कडून ताडी गुत्ता चौकाकडे जाणा-या रोडवर कार क्रमांक एम एच १२ एन ई .४४६४ ने पहिल्यांदा अॅक्टीव्हाला पाठीमागून जोरात धडक दिली व नंतर एक्सेस बाईकस्वारला जोरात धडक दिल्याने झालेल्या अपघातात रुऊफ अकबर शेख हा ठार झाला आहे.त्याला उपचारासाठी हडपसर येथील नोबेल हाॅस्पीटल मध्ये दाखल करण्यात आले होते उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.दरम्यान अपघातानंतर फरार झालेला कार चालक आयुष प्रदीप तयाल ( रा.हडपसर पुणे) याला पोलिसांनी 👮 अटक केली आहे.दरम्यान अपघातामधील कार चालकाला सीसीटीव्ही कॅमेरा 📷 मध्ये कारचा नंबर आल्यावर त्याला अटक केली.आहे . दरम्यान यापूर्वी देखील कल्याणीनगर येथे अल्पवयीन मुलांने पोर्शे कार ने दोन जणांना चिरडल्याने दोन जणांचा मृत्यू झाला होता.पुण्यात दिवसांदिवस हीट अॅड रनच्या घटनेत वाढ झाली आहे.

 

Previous article‘लाडकी बहीण योजनेंबाबत ‘ पत्रकाराची महायुती सरकारला नोटीस
Next articleमाजी खासदार नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here