पुणे दिनांक ११ ऑक्टोबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच एक राजकीय वर्तुळातून एक खळबळजनक अपडेट हाती आली असून.अमरावतीच्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्या व माजी खासदार नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.दरम्यान सदरची धमकी ही एक पत्राद्वारे देण्यात आली आहे.तसेच सदरच्या पत्रात अश्लिल भाषेच्या उल्लेख असल्याची माहिती सूत्रांनद्वारे मिळत आहे.दरम्यान हे पत्र कोणी पाठवले? याचा तपास पोलिस करीत आहेत. यापूर्वी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे बळवंत वानखेडे यांनी नवनीत राणा यांचा पराभव केला आहे.यानंतर नवनीत राणा आता विधानसभेची निवडणूक लढवणार आहेत.अशी अमरावती मध्ये चर्चा सुरू आहे.