Home Breaking News पुण्यातील ७ पुजा-यांचे अपहरण करून कुटूंबाकडे मागितली ५ कोटी रुपयांची खंडणी, पोलिसांनी...

पुण्यातील ७ पुजा-यांचे अपहरण करून कुटूंबाकडे मागितली ५ कोटी रुपयांची खंडणी, पोलिसांनी 👮 आवळल्या कर्नाटकातून ३ जणांच्या मुसक्या

79
0

पुणे दिनांक १३ ऑक्टोबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट आली असून पुण्यातून ७ पुजा-यांना घराची पूजा व मूर्तीची प्रतिष्ठापना करावयाची असे सांगून त्यांना विजापूर येथील एका घरात डांबून ठेवून त्यांच्या कुटुंबीयांकडे ५ कोटी रुपयांची खंडणी मागणी करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली दरम्यान पोलिसांनी 👮 यातील पुजा-यांची सुटका कर्नाटक येथून करून ३ जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

दरम्यान या अपहरण प्रकरणी पुणे पोलिसांनी 👮 दिलेल्या माहितीनुसार बजरंग लोंढे हे  पुण्यात पुजा-यांचे काम करतात.दिनांक २९ जुलै रोजी लोंढे यांच्या मुलांबरोबर त्यांच्या घरी आरोपी आले व विजापूर येथे एका घराची पूजा व मुर्तीष्ठापना करायची असं सांगितलं व कर्नाटक येथील विजापूर येथील पत्ता देऊन गेले.नंतर लोंढे व त्यांचे शिष्य असे एकूण ७ जण हे सदर ठिकाणी गेले.असता त्यांना या आरोपींनी एका खोलीत डांबून ठेवले.फोनवरुन त्यांच्या कुटुंबीयांना ५ कोटी रुपयांची खंडणी मागितली.त्यानंतर लोंढे यांच्या कुटुंबीयांच्या वतीने बिबवेवाडी पोलिस स्टेशन मध्ये फिर्याद दिली त्यानंतर पोलिसांनी 👮 तांत्रिक विश्लेषण करून कर्नाटक पोलिसांशी संपर्क साधून या प्रकरणाची माहिती दिली.त्यानंतर पोलिसांनी रायचूर येथे जाऊन या ७ पुजा-यांची सुटका केली आहे.यात पोलिसांनी १) रामु वळून.२) दत्ता करे ३) हर्षद पाटील या तीन जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

Previous articleमहाराष्ट्रात सत्ताधाऱ्यांना बुलेटप्रुफ जॅकेट घालण्याची वेळ, बाबा सिद्दिकींच्या हत्येवरुन विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा महायुती सरकारवर हल्लाबोल
Next article१२ तासात एकूण ३ राज्यांत भूकंपाचे धक्के, भूकंपामुळे लोकांमध्ये एकच खळबळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here