पुणे दिनांक १३ ऑक्टोबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते बाबा सिद्दिकी यांची काल रात्रीच्या सुमारास मुंबईत गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे.दरम्यान या घटनेची उच्चस्तरीय चौकशीची मागणी काॅग्रेस पक्षाचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांची झिशान सिद्दिकी यांच्या कार्यालयासमोर ३ चे ४ व्यक्तीने गोळीबार करून हत्या करण्यात आली आहे.दरम्यान या हत्या प्रकरणी पोलिसां नी दोन जणांना ताब्यात घेतले आहे.तर अन्य दोन आरोपींच्या शोधा करीता परराज्यात चार गुन्हे शाखेची पथकं रवाना झाली आहेत.तसेच बाबा सिद्दिकी यांना पोलिस संरक्षण असताना देखील देखील त्यांच्यावर गोळीबार होत असेल तर हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे.तसेच वाय दर्जाची सुरक्षा असताना सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांवर जर अशाप्रकारे गोळीबार होत असेल तर ही अत्यंत गंभीर बाब आहे.
दरम्यान या प्रकरणी पुढे बोलताना विजय वडेट्टीवार हे म्हणाले की सध्या राज्यात कायदा सुव्यवस्थेची अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की.कोण सुरक्षित आहे हा एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.सत्ताधा-यांना बुलेटप्रुफ जॅकेट घालण्याची वेळ आहे.आता महायुतीच्या सत्ताधारी यांनी आता मोठे फलक लावून लोकांना सांगायला पाहिजे की .आपली सुरक्षा आपण स्वतः करा.असा खोचक सल्ला त्यांनी यावेळी दिला आहे.दरम्यान सत्ताधारी योजना व सत्ता मिळविण्यात व्यस्त आहे.त्यामुळे महाराष्ट्रामधील पोलिसांचे इंटेलिजन्स काम करत नाहीत. महाराष्ट्रात कायद्याचे राज्य राहिले नाही.तर गुंडाचे राज्य आहे.विरोधी पक्ष नेता म्हणून मी बाबा सिद्दिकी यांना श्रध्दांजली अर्पण करतो.तसेच त्यांच्या कुटुंबीयांना या घटनेतून सावरण्याची शक्ती मिळेल.अशी प्रार्थना करतो.असे काॅग्रेस पक्षाचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.