पुणे दिनांक १३ ऑक्टोबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट आली असून पुण्यातून ७ पुजा-यांना घराची पूजा व मूर्तीची प्रतिष्ठापना करावयाची असे सांगून त्यांना विजापूर येथील एका घरात डांबून ठेवून त्यांच्या कुटुंबीयांकडे ५ कोटी रुपयांची खंडणी मागणी करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली दरम्यान पोलिसांनी 👮 यातील पुजा-यांची सुटका कर्नाटक येथून करून ३ जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
दरम्यान या अपहरण प्रकरणी पुणे पोलिसांनी 👮 दिलेल्या माहितीनुसार बजरंग लोंढे हे पुण्यात पुजा-यांचे काम करतात.दिनांक २९ जुलै रोजी लोंढे यांच्या मुलांबरोबर त्यांच्या घरी आरोपी आले व विजापूर येथे एका घराची पूजा व मुर्तीष्ठापना करायची असं सांगितलं व कर्नाटक येथील विजापूर येथील पत्ता देऊन गेले.नंतर लोंढे व त्यांचे शिष्य असे एकूण ७ जण हे सदर ठिकाणी गेले.असता त्यांना या आरोपींनी एका खोलीत डांबून ठेवले.फोनवरुन त्यांच्या कुटुंबीयांना ५ कोटी रुपयांची खंडणी मागितली.त्यानंतर लोंढे यांच्या कुटुंबीयांच्या वतीने बिबवेवाडी पोलिस स्टेशन मध्ये फिर्याद दिली त्यानंतर पोलिसांनी 👮 तांत्रिक विश्लेषण करून कर्नाटक पोलिसांशी संपर्क साधून या प्रकरणाची माहिती दिली.त्यानंतर पोलिसांनी रायचूर येथे जाऊन या ७ पुजा-यांची सुटका केली आहे.यात पोलिसांनी १) रामु वळून.२) दत्ता करे ३) हर्षद पाटील या तीन जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत.