पुणे दिनांक १३ ऑक्टोबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज) आताच एक खळबळजनक अपडेट हाती आली असून.माजी आमदार व तसेच माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी यांच्या हत्याप्रकरणी आणखी एका आरोपीला रात्री उशिरा पुण्यातून अटक करण्यात आली आहे. त्याचे नाव प्रविण लोणकर असं आहे.दरम्यान या प्रकरणी गुरमैल सिंग व धर्मराज कश्यप या आरोपींना या पूर्वीच अटक करण्यात आली आहे.तर अन्य दोनजण हे फरार आहेत.त्यांच्या शोधा करीता मुंबई गुन्हे शाखेच्या एकूण १५ टीम ह्या परराज्यात दाखल झाल्या आहेत. दरम्यान शनिवारी रात्री बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता.यात उपचार दरम्यान सिद्दिकी यांचा मृत्यू झाला होता.