पुणे दिनांक १३ ऑक्टोबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच एक हाती आलेल्या अपडेट नुसार.उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांची हत्या काल मुंबईत तीन अज्ञात व्यक्तीने गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे.त्यानंतर महायुती सरकार चांगलेच अलर्ट झाले आहे.दरम्यान मलबार हिल येथील मंत्र्यांच्या बंगल्यांच्या सुरक्षेत मोठ्या प्रमाणावर करण्यात आली आहे.मंत्र्यांच्या बंगालच्या परिसरातील गस्त आता मुंबई पोलिसांनी वाढवली आहे.तसेच महत्वाच्या पाईंटवर आता नाकाबंदी करण्याचे आदेश गृहविभागाने दिले आहेत.