पुणे दिनांक १४ ऑक्टोबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार रांजणे राजगड गावाच्या हद्दीत रविवारी रात्रीच्या सुमारास रिक्षाला भीषण अपघात झाला असून.या अपघातात दोन मायलेकांचा मृत्यू झाला आहे तर एक विवाहित महिला गंभीर रित्या जखमी झाली आहे.सदर अपघात हा रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास रांजणे गावाच्या हद्दीत झाला आहे. अशी माहिती सूत्रांनद्वारे मिळत आहे.
दरम्यान या अपघातात मृत्यू झालेल्या दौंड येथील दोन मायलेकांचे नावे १) शालन पासलकर ( वय ६५ रा.दौंड जि.पुणे ) २) दीपक पासलकर ( वय ४५ रा.दौंड जि.पुणे ) अशी आहेत.तर जखमी झालेल्या महिलेचे नाव कविता मरळ ( वय ४० रा.कानंद .राजगड जि.पुणे) असे आहे. हे सर्वजण रविवारी रात्री साडेनऊ वाजता रिक्षाने पांडे घाट मार्गे पुण्याकडे जात असताना रांजणे गावाच्या हद्दीत छोट्या पुलाला रिक्षा धडकून हा अपघात झाला आहे.अशी प्राथमिक माहिती प्रथमदर्शनी मिळत आहे.