पुणे दिनांक १४ ऑक्टोबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक राजकीय वर्तुळातून खळबळजनक अपडेट आली असून.फलटण येथील रामराजे नाईक निंबाळकर यांचे बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर व दीपक चव्हाण हे आज सोमवार दिनांक १४ ऑक्टोबर रोजी शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत.त्यांच्या बरोबर अनिकेत राजे व विश्वजितराजेंसह सातारा जिल्ह्यातील अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी देखील जेष्ठ नेते शरद पवार यांच्या गटात दुपारी साडेतीन वाजता शरद पवार यांच्या उपस्थितीत फलटण येथे हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे. दरम्यान सध्या तरी रामराजे नाईक निंबाळकर हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटात राहणार आहेत.