पुणे दिनांक १४ ऑक्टोबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच एक खळबळ जनक अपडेट ही मराठी चित्रपटसृष्टीतून आली असून.जेष्ठ अभिनेते अतुल परचुरे यांचे आज सायंकाळी निधन झाले आहे.त्यांनी वयाच्या ५७ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे.त्यांनी नाटक.सिनेमा.तसेच मालिका मध्ये काम करुन मराठी प्रेक्षकांच्या हृदयात एक वेगळे स्थान निर्माण केले होते.दरम्यान त्यांना मागील काही दिवसांपूर्वी कर्करोग झाला होता.त्यातून ते बरे देखील झाले होते अशी माहिती मिळत होती. पण आज सायंकाळी त्यांचे दुःखद निधन झाल्याचे वृत्त आता समोर आले आहे.त्यांच्या निधनानंतर अनेक मराठी कलाकार यांनी हळहळ व्यक्त केली आहे.