पुणे दिनांक १४ ऑक्टोबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच राजकीय वर्तुळातून एक खळबळजनक अपडेट हाती येत असून. महाराष्ट्र सदन घोटाळ्याची सुनावणी तातडीने घेण्यात यावी या मागणी साठी आता याचिकाकर्ते आग्रही आहेत.त्या मुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व अन्न धान्य पुरवठा मंत्री छगन भुजबळांच्या अडचणीत मोठ्या प्रमाणावर वाढ होण्याची शक्यता आहे.दरम्यान या प्रकरणात ९ सप्टेंबर २०२१ रोजी एसीबीच्या विशेष न्यायालयाने भुजबळ व त्यांच्या कुटुंबीयांना दोषमुक्त केले होते.दरम्यान या निर्णयाला मुंबईतील सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया व दीपक देशपांडे व महायुती मधील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटाचे आमदार सुहास कांदे यांच्या तर्फे तीन स्वातंत्र्य याचिका न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत.