पुणे दिनांक १४ ऑक्टोबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) माजी आमदार तसेच माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पुणे येथील वारजे येथून तिसरा आरोपी प्रवीण लोणकरला अटक केली होती.त्याला आज पोलिसांनी 👮 त्यांला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला २१ ऑक्टोबर पर्यंत पोलिस कस्टडी दिली आहे.दरम्यान बाबा सिद्दिकी यांच्या हत्या नंतर या प्रकरणाचा खुलासा करणारी फेसबुक पोस्ट करणा-या शुभम लोणकर याचा भाऊ प्रवीण लोणकरला रविवारी पुण्यातील वारजे येथून मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक करून त्याला तपासासाठी मुंबईला नेण्यात आले होते.आज सोमवारी त्याची वैद्यकीय तपासणी करून त्याला एस्प्लेनेड न्यायालयात हजर करण्यात आले होते.दरम्यान या आधी पोलिसांनी या खूनप्रकरणी गुरुमैल सिंग व धर्मराज कश्यप यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यांना न्यायालयाने २१ ऑक्टोबर पर्यंत पोलिस कस्टडी देण्यात आली आहे.