पुणे दिनांक १५ ऑक्टोबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आज सकाळीच राजकीय वर्तुळातून एक खळबळजनक अपडेट हाती आली असून.भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नेत्यांची बैठक ही काल दिल्लीत वरिष्ठ नेत्यांबरोबर झाली आहे.दरम्यान सदरच्या बैठकीनंतर आता पहिल्या भाजपच्या यादीत यातील काही विद्यमान आमदारांची नावे असणार आहेत.तर मात्र भाजप पक्षश्रेष्ठी काही निष्क्रिय विद्यमान आमदारांची तिकीट कापणार असल्याची माहिती समोर आली आहे.दरम्यान मागील ५ वर्षात ज्या आमदारांचे काम त्यांच्या मतदार संघात चांगले नाही.तसेच आधी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकात पराभूत झालेल्यांना त्यांनाही तिकीट मिळणार नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.एकंदरीत अशा निष्क्रिय विद्यमान आमदार भाजप पक्ष आता कात्रजचा घाट दाखवणार आहे.