पुणे दिनांक १५ ऑक्टोबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक अपडेट लाडक्या बहिणींच्या फायद्याची हाती आली असून.मुख्यमंत्री लाडक्या बहिणींना खास दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सर्व लाभार्थी बहिणींना ३ हजार रुपये बोनस देणार आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महायुती सरकारच्या वतीने लाडक्या बहिणींना दिवाळी साठी एक खास गिफ्ट देण्याची घोषणा केली आहे.दरम्यान महायुतीच्या सरकारने म्हणले आहे की.दिवाळीच्या सणा निमित्ताने या योजनांतील सर्व पात्र महिलांना ३ हजार रुपयांचा बोनस दिला जाईल.दरम्यान ही बोनसची रक्कम महिन्याला नियमित मिळणाऱ्या पैशांच्या व्यतिरिक्त असणार आहे. तसेच यातील काही निवडक महिलांना २ हजार ५०० रुपयांची अतिरिक्त रक्कम देखील दिली जाणार आहे.असे एकूण मिळून ५ हजार ५०० रुपये महिलांना मिळणार आहेत.अशी माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळत आहे.