पुणे दिनांक १६ ऑक्टोबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) महाराष्ट्रात आज पुण्यासह अनेक जिल्ह्यात विजांच्या कडकडाटात तसेच वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळणार असल्याचा अलर्ट हवामान विभागाच्या देण्यात आला आहे.पुण्यात रात्रीपासून हलक्या सरी कोसळत आहे.तसेच ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे.तसेच मुंबई व ठाण्यात आज बुधवारी पाऊस पडेल पालघर.ठाणे.या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.मुंबई सध्या मोठ्या प्रमाणावर उकाडा जाणवत आहे.येथील कमाल तापमान ३१.C आणि किमान तापमान हे २७.C असू शकते.
दरम्यान पुणे शहरासह जिल्ह्यात हवामान विभागाच्या वतीने यलो अलर्ट घोषित केला आहे.घाट माथ्यावर काही दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे.तसेच मागील ३ ते ४ दिवसांपासून पुण्यात उकाडा वाढलेला आहे.उकाड्या मुळे पुणेकर नागरिक हैराण झाले आहे. तसेच विदर्भात भंडारा.नागपूर . वर्धा.यवतमाळ .या जिल्ह्यात विजांच्या कडकडाटात व वादळी वाऱ्यासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाच्या वतीने वर्तविण्यात आला आहे.तसेच मराठवाड्यातील जालना.संभाजीनगर.तसेच हिंगोली. या जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटात पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.तसेच प्रति तास ३० ते ४० किमी वेगाने सोसाट्याच्या वारा वाहू शकतो. दरम्यान काही ठिकाणी परतीच्या पावसानं विश्रांती घेतली आहे तरी काही ठिकाणी यलो अलर्ट घोषित करण्यात आला आहे.तसेच पश्र्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊसाची शक्यता हवामान विभागाच्या वतीने अंदाज वर्तविण्यात आला आहे.