Home Breaking News पुण्यातील घोरपडेपेठेत भीषण आग 🔥, ५ घरं व १ दुकान आगीत जळून...

पुण्यातील घोरपडेपेठेत भीषण आग 🔥, ५ घरं व १ दुकान आगीत जळून खाक कोणत्याही प्रकारची जीवीतहानी नाही

64
0

पुणे दिनांक १७ ऑक्टोबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच पुण्यातून एक खळबळजनक अपडेट हाती आली असून आज गुरुवारी पहाटे साडे तीन वाजण्याच्या सुमारास घोरपडे पेठेत अग्नितांडव पाहण्यास मिळला आहे.पंचहौद टाॅवर जवळील जोशी वाड्यात भीषण अशी आग लागली दरम्यान या आगी मध्ये वाड्यातील एकूण ५ घरे व १ दुकान जळून खाक झाले आहे.

दरम्यान या आगी बाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार आज पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास जोशी वाड्याला आग लागली.दरम्यान या आगी बाबत पुणे महापालिकेच्या अग्निशमन दलाला माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ५ गाड्या व २ टॅकर तातडीने घटनास्थळी दाखल झाले.अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग आटोक्यात आणली आहे. दरम्यान सुदैवाने या आगीत कोणतीही प्रकरची जीवीत हानी झाली नाही.या आगीत ५ घरे व एक दुकान जळून खाक झाले आहे.दरम्यान सदरची आग  या वाड्याला कशी लागली हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. परंतु शाॅकसर्कीट मुळे ही आग लागली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Previous articleराज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नीच्या कारला अपघात
Next articleराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दीपक साळुंखे व भाजपचे राजन तेली उध्दव ठाकरे यांच्या गटात करणार प्रवेश

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here