पुणे दिनांक १७ ऑक्टोबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) महाराष्ट्रात विधानसभेचे बिगुल वाजल्या नंतर मराठा समाजाचे नेते व आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महायुतीच्या सरकारचा सुपडा साफ करणार असे म्हणाले होते.तसेच त्यांनी २० ऑक्टोबर रोजी अंतरवाली सराटीत मराठा समाजाच्या बांधवांची मिटींग बोलवली आहे.दरम्यान मराठा समाजाला आरक्षण देण्यास भारतीय जनता पार्टीच मोठी अडसर आहे.असं मत जरांगे पाटील यांचे झाले आहे.
दरम्यान यासर्व घडामोडी पाहता महायुती मधील मराठा समाजाचे मंत्री आता अंतरवाली सराटीत येत आहेत.व मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतल्याचे एकंदरीत चित्र निर्माण झाले आहे.काल रात्री अहिल्या नगर जिल्ह्यातील माजी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी रात्री अंतरवाली सराटीत येत मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे.विशेष आठच दिवसात ही त्यांची दुसरी भेट आहे.यापूर्वी राज्याचे माजी उद्योग मंत्री व मुख्यमंत्री यांच्या जवळचे नेते उदय सामंत यांनी जरांगे पाटील यांची भेट घेतली होती.हे सर्व मराठा मंत्री मनोज जरांगे पाटील यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न करत आहे.एकंदरीत महायुतीच्या सरकारने जरांगे पाटील यांच्या चांगलीच धास्ती घेतली आहे.दरम्यान जरांगे पाटील हे त्यांच्या शब्दांवर ठाम आहे.ते मराठा समाजाला आरक्षण न मिळाल्याने महायुती सरकारवर चांगलेच नाराज झाले आहेत.व ते या सरकारचा सुपडा साफ केल्या शिवाय राहणार नाही त्यांनी आता चांगलेच दंड थोपटले आहेत.