पुणे दिनांक १८ ऑक्टोबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता राजकीय वर्तुळातून एक खळबळजनक अपडेट हाती आली असून.भारतीय जनता पक्षाचे कोकण येथील नेते राजन तेली व सोलापूर येथून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष दीपक आबा सांळुखे हे दोघेजण शिवसेना उध्वव ठाकरे यांच्या गटात पक्ष प्रवेश करुन हातात मशाल घेणार आहेत.अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
दरम्यान भारतीय जनता पक्षाचे नेते राजन तेली यांनी भाजपचा प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.दरम्यान राजन तेली यांनी राजीनामा दिल्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर व भाजपचे खासदार नारायण राणे यांच्यावर चांगलाच हल्लाबोल केला आहे.तसेच मतदार संघात चालत आसलेली घराणेशाही मान्य नाही.तसेच खासदार नारायण राणे यांच्या परिवाराकडून अंतर्गत खच्चीकरण होत आहे. असा आरोप देखील केला आहे.दरम्यान राजन तेली हे सांवतवाडी विधानसभा मतदारसंघातून विधानसभा निवडणुक लढवण्यासाठी इच्छुक आहेत.तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सोलापूर येथील जिल्हाध्यक्ष दीपक आबा सांळुखे देखील हे शिवसेना उध्वव ठाकरे यांच्या गटात प्रवेश करणार आहेत. दरम्यान सांळुखे हे सोलापूर जिल्ह्यातील सांगोला विधानसभा मतदारसंघातून विधानसभा निवडणुक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. हे दोघेजण लवकरच मुंबई दाखल होऊन शिवसेना उध्वव ठाकरे यांच्या गटात पक्ष प्रवेश करुन हातात मशाल घेणार आहेत.दरम्यान विधानसभा निवडणुकी च्या अगदी तोंडावर शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षाल व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना चांगलीच धोबीपछाड दिली आहे.