Home Breaking News मतदानापूर्वीच आटपाडीत ५०० रुपयांच्या नोटा चक्क ओढ्याच्या पाण्यात आल्या वाहून

मतदानापूर्वीच आटपाडीत ५०० रुपयांच्या नोटा चक्क ओढ्याच्या पाण्यात आल्या वाहून

53
0

पुणे दिनांक १९ ऑक्टोबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) राज्यात विधानसभाचे वारं सुटलं आहे. अद्याप सर्व राजकीय पक्षांमध्ये विधानसभ निवडणूक जागा वाटप सुरू आहे.तसेच अजून मतदान देखील लांब आहे.दरम्यान ओढ्यामधील पाण्यात पाचशे रुपयांच्या नोटा वाहून येत असल्याचा प्रकार समोर आला आहे.सांगली जिल्ह्यातील आटपाडीच्या गदिमा पार्क समोर असणा-या ओढ्यातील हा प्रकार आहे. दरम्यान आज येथील आठवडा बाजार होता.व नोटा ओढ्यात वाहत असल्याची माहिती या परिसरात सर्वत्र वा-या सारखी पसरली इथे पुरुष व महिला तसेच लहान मुलांची एकच तुफान गर्दी केली आहे.दरम्यान ओढ्यातील पाण्यात नोटा शोधताना दिसून आले आहे.यात अनेकांना ५०० रुपयांच्या नोटा सापडल्या आहेत.इथे एका युवकाला १० जारी रुपयांच्या नोटा सापडल्या आहेत.दरम्यान ही माहिती पोलिसांना मिळाल्या नंतर पोलिसांना ह्या नोटा ख-या आहेत का खोट्या आहेत? याची तपासणी केली जात आहे.अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

Previous articleमुख्यमंत्री यांच्या गटाचे संतोष बांगरांना निवडणूक आयोगाची नोटीस
Next articleमनोज जरांगे पाटील यांनी घेतली मुस्लिम धर्मगुरुंची भेट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here