महाराष्ट्रातील एकूण ९ खासगी मेडीकल कॉलेज रडारवर,यात पुण्यातील न-हे येथील काशीबाई नवले मेडिकल कॉलेजचा समावेश २ अधिका-यांची समिती नियुक्त, तातडीने आठ दिवसांमध्ये अहवाल देण्याचे आदेश
पुणे दिनांक १९ ऑक्टोबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच एक महाराष्ट्रातील खासगी एकूण ९ मेडीकल कॉलेजच्या संदर्भात खळबळजनक अपडेड हाती आली असून.वैद्यकीय महाविद्यालयां मध्ये संस्थात्मक कोट्यातून प्रवेशात गैरव्यवहार केल्या प्रकरणी तसेच विद्यार्थ्यांकडून अतिरिक्त विकास शुल्काची आकारणी केल्या प्रकरणी दाखल तक्राराची दखल वैद्यकीय शिक्षण विभागाच्या वतीने घेण्यात आली आहे.दरम्यान आता त्यानुसार महाराष्ट्रातील एकूण ९ खासगी वैद्यकीय महाविद्यालयांची तपासणी करण्याचे निर्देश वैद्यकीय शिक्षण आयुक्तांनी दिले आहेत.त्यासाठी प्रत्येक महाविद्यालयाच्या तपासणी साठी दोन अधिका-यांच्या समितीची नियुक्ती केली आहे.तसेच या समितीला आठ दिवसांची मुदत दिली आहे.आठ दिवसांमध्ये या खासगी वैद्यकीय महाविद्यालयांची तपासणी करून तसा अहवाल राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडे सादर करावयाचा आहे.
दरम्यान मेडीकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांकडून विकास शुल्कच्या नावाखाली अधिक शुल्क घेतल्याचा आरोप युवा सेनाचे सहसचिव कल्पेश यादव यांनी केला होता. याबाबत शुल्क नियामक प्राधिकरण आणि वैद्यकीय शिक्षण विभागाकडे तक्रार दाखल केली होती.त्या नुसार वैद्यकीय शिक्षण विभागाच्या वतीने या तक्रारी संदर्भात दखल घेऊन चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.दरम्यान या वैद्यकीय महाविद्यालयांची चौकशी करण्यात येणार आहे.यात पुण्यातील तीन मेडीकल कॉलेजचा समावेश आहे.१) तेरणा वैद्यकीय महाविद्यालय.नवी मुंबई २) वेदांता इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस.पालघर.३) डॉ.एन.वाय. तासगावकर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस काॅलेज कर्जत .४) श्रीमती काशीबाई नवले वैद्यकीय मेडिकल कॉलेज न-हे पुणे.५) एमआयएमईआर वैद्यकीय महाविद्यालय तळेगाव दाभाडे पुणे.६) भारत रत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय पुणे.७) अश्र्विनी वैद्यकीय महाविद्यालय सोलापूर ८) प्रकाश इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अॅड रिसर्च.सांगली ९)एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालय.लातूर .अशी आहेत.दरम्यान विकसन शुल्काआड पालकांची भंयकर लूट.कैंप फेरीत मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शुल्क सवलत नाकारण्यात येत आहे.तसेच महाविद्यालयांकडून विकासान शुल्काच्या नावाखाली विद्यार्थी व पालकांची लूट सुरू आहे.या काॅलेज यांना विकासन शुल्क म्हणून शुल्काच्या १० टक्के रक्कम घेणे अनिवार्य असताना ते सरसकट ५० हजार ते २ लाखांच्या दरम्यान अतिरिक्त शुल्क आकारत आहे.असेही तक्रारीत नमूद आहे.