पुणे दिनांक १९ ऑक्टोबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच राजकीय वर्तुळातून एक खळबळ जनक अपडेट हाती आली असून. शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे आमदार संतोष बागंर यांना आज निवडणूक आयोगाकडून नोटीस बजावण्यात आली आहे.दरम्यान बागंर यांनी कळमनुरी येथील एका सभेत बोलताना मतदारांना परत आणण्यासाठी फोन पे करा.असं विधान केले होते.दरम्यान याच वक्तव्या संदर्भात त्यांना निवडणूक आयोगाच्या वतीने ही नोटीस बजावण्यात आली आहे.येत्या २४ तासांमध्ये तातडीने खुलासा करण्याचे निर्देश आयोगाने दिले आहेत.दरम्यान बागंर यांच्या वक्तव्यावर काही राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगाकडे संतोष बागंर यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती.बागंर यांनी आदर्श आचारसंहितांचे उल्लंघन केल्याचा आरोप केला होता.