पुणे दिनांक १९ ऑक्टोबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच एक राजकीय वर्तुळातून खळबळ जनक अपडेट हाती आली असून.सर्वोच्च न्यायालयाने काॅग्रेस पक्षाच्या नेत्या रश्मी बर्वेंना दिलासा दिला आहे. बर्वेंच्या जात पडताळणी बाबत राज्य सरकारच्या वतीने दाखल केलेल्या अनुमती याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे.दरम्यान निवडणुकीच्या तोंडावर जात प्रमाणपत्र रद्द केल्यानंतर बर्वे यांनी नागपूर खंडपीठात दाद मागितली.यावर मुंबई उच्च न्यायालयाने बर्वे यांचे जात प्रमाणपत्र रद्द करणे चुकीचे ठरवले होते.दरम्यान उच्च न्यायालयाच्या विरोधात राज्य सरकारच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.