Home Breaking News मंत्री छगन भुजबळ यांचे मनोज जरांगेंना खुलं आव्हान‌

मंत्री छगन भुजबळ यांचे मनोज जरांगेंना खुलं आव्हान‌

67
0

पुणे दिनांक २० ऑक्टोबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आता एक राजकीय वर्तुळातून खळबळ जनक अपडेट हाती आली असून.राज्यात सर्वत्र विधानसभेच्या निवडणुकांची धामधूम सुरू असतानाच मराठा समाजाचे नेते व आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना आता मंत्री छगन भुजबळ यांनी खुलं आव्हान दिले आहे.जरांगे पाटील यांनी विधानसभेत उमेदवार उभे करावेत.असं भुजबळ यांनी म्हटले आहे.दरम्यान लोकशाहीत निवडणूका लढवण्याच्या सर्वांना अधिकार आहे.दरम्यान राज्यात आता अनेक पक्ष निर्माण झाले आहेत.त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील यांनी देखील प्रयत्न करावेत.असं देखील भुजबळ यांनी यावेळी म्हटले आहे.दरम्यान आज अंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील यांची निर्णायक बैठक होत आहे.या बैठकीला राज्यभरातील कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.दरम्यान आजच्या बैठकीत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत महत्वाचे निर्णय होणार आहे.

Previous articleपुण्यातील बोपदेव घाट प्रकरणातील पीडितेला ५ लाखांची मदत
Next articleमुंबईतील जे.जे.हाॅस्पीटल शुट‌आऊट प्रकरणी आरोपीला चक्क ३२ वर्षांनी अटक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here