Home Breaking News मुंबईतील जे.जे.हाॅस्पीटल शुट‌आऊट प्रकरणी आरोपीला चक्क ३२ वर्षांनी अटक

मुंबईतील जे.जे.हाॅस्पीटल शुट‌आऊट प्रकरणी आरोपीला चक्क ३२ वर्षांनी अटक

51
0

पुणे दिनांक २० ऑक्टोबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आता मुंबईतून एक खळबळजनक अपडेट हाती आली असून.मुंब‌ई येथील जे.जे.हाॅस्पीटल मध्ये शुट‌आऊट प्रकरणातील आरोपीला तब्बल ३२ वर्षांनी अटक केली आहे.दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उत्तरप्रदेश येथील ६२ वर्षीय त्रिभूवन सिंगला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दिनांक १२ सप्टेंबर १९९२ मध्ये मुंबई येथील जे.जे. हाॅस्पीटलमध्ये झालेल्या शुट‌आऊट मध्ये एकूण तीन जणांची हत्या करण्यात आली होती.मुंब‌ईचा डॉन अरुण गवळी गॅंगचा शार्प शुटर शैलैश हळदणकर याची दाऊद गॅंगने हत्या केली होती.दरम्यान डॉन अरुण गवळीने दाऊद इब्राहिम गॅगचा इस्माईल पारकरची हत्या केली होती.या हत्याचा बदला म्हणून शैलेश हळदणकर हा मुंबईतील जे.जे.हाॅस्पीटल मध्ये उपचारासाठी दाखल असताना यावेळी दाऊद इब्राहिम गॅंगने तब्बल ५०० गोळ्या झाडून हत्या केली होती. यात शैलेश हळदणकर यांच्यासह तीन जणांची हत्या करण्यात आली होती.

Previous articleमंत्री छगन भुजबळ यांचे मनोज जरांगेंना खुलं आव्हान‌
Next articleपुण्यातील मेट्रोच्या स्थानकाला मध्यरात्री भीषण आग 🔥

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here