पुणे दिनांक २१ ऑक्टोबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच पुण्यातून एक खळबळजनक वृत्त हाती येत असून एक महिन्यापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या महात्मा फुले मंडई परिसरातील मेट्रोस्थानकाला मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागली होती.दरम्यान सदर घटनेची माहिती मिळताच पुणे महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या एकूण ५ गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या व त्यानंतर पाच मिनिटांमध्ये ही आग आटोक्या मध्ये आणली आहे.दरम्यान या आगीत कोणतीही प्रकारची जीवीतहानी झालेली नाही.मात्र मोठ्या प्रमाणावर या मेट्रो स्थानकाचे नुकसान झाले आहे. दरम्यान या स्थानकाचे उद्घाटन दिनांक २६ स्प्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते.