पुणे दिनांक २१ ऑक्टोबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच पुण्यातील राजकीय वर्तुळातून एक खळबळजनक अपडेट हाती आली असून.कसबा विधानसभेचे काॅग्रेस पक्षाचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्याविरोधात समर्थ पोलिस स्टेशन मध्ये आचार संहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान काॅग्रेस पक्षाचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्या कार्यकर्त्यांनी दिवाळीच्या सणात निमित्ताने धंगेकर यांची जाहिरात असलेल्या पिशवी मधून लोकांना साहित्यांचे वाटप केले.अशी तक्रार भारतीय जनता पार्टीचे वतीने निवडणूक आयोगाकडे तसेच समर्थ पोलिस स्टेशन मध्ये केली होती.यानंतर अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील यांनी याबाबत चौकशी केली होती.व त्यानंतर आमदार रवींद्र धंगेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान या प्रकरणी बोलताना आमदार रवींद्र धंगेकर यांनी बोलताना म्हणाले आहे की.प्रशासनाला आनंदाचा शिधा वरील जाहिरात दिसत नाही का? असा प्रश्न उपस्थित केला आहे.तसेच दरवर्षी माझ्या प्रतिष्ठान मार्फत हे वाटपाचे काम सुरू असते . तसेच अद्याप मी विधानसभा निवडणुकीचा अर्ज दाखल केला नाही तरी माझ्यावर आचारसंहिताचा भंग केला असा गुन्हा कसा दाखल केला जातो.विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली असून म्हणून ते पोलिस प्रशासनाला पुढं करुन असे उद्योग करत आहेत.असे काॅग्रेस पक्षाचे कसबा मतदार संघाचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी म्हटले आहे.