पुणे दिनांक २२ ऑक्टोबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती नागपूर येथून एक खळबळ जनक वृत्त आले असून.नागपूर येथे सुपरफास्ट शालिमार एक्स्प्रेसचे दोन डबे रेल्वे ट्रॅकवरुन घसरले आहेत.दरम्यान या दोन डब्यामध्ये एस टू व आणि पार्सलचा समावेश आहे.दरम्यान या प्रकरणी सूत्रां कडून मिळालेल्या माहितीनुसार.शालिमार सुपरफास्ट एक्स्प्रेस ही नागपूर वरुन निघाली असता कळमना जवळ अचानकपणे रेल्वेचे दोन डबे रेल्वेच्या ट्रॅकवरुन खाली आले आहेत.यावेळी रेल्वेचा वेग कमी होता . त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे.दरम्यान सदरच्या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवीतहानी झालेली नाही.दरम्यान सदरचा अपघात झाल्यानंतर रेल्वे प्रशासनाच्या वतीने आता रेल्वेच्या ट्रॅकवरुन घसरलेले डबे पूर्ववत रेल्वे ट्रॅकवर घेण्याचे काम सुरू आहे. दरम्यान हे काम पुर्ण होण्यासाठी ३ ते ४ तासांचा अवधी लागू शकतो असे रेल्वे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.दरम्यान या अपघातानंतर या मार्गावरील रेल्वेची वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे.