पुणे दिनांक २२ ऑक्टोबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच राजकीय वर्तुळातून एक खळबळ जनक अपडेट हाती आली असून.महायुती सरकारने शक्तीपीठ महामार्ग रद्द न केल्याने एकूण १२ जिल्ह्या मधील शेतकरी चांगलेच आक्रमक झाले आहेत.१२ जिल्ह्यातील महायुतीचे एकूण ७२ विधानसभेचे उमेदवार पाडण्याची एकमुखी घोषणा शेतकऱ्यांसह शक्तीपीठ विरोधी समितीने केली आहे.दरम्यान कोल्हापुरात शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांची निर्धार परिषद पार पडली.सदरच्या परिषदेत यावेळी शेतकरी यांनी या बाबत ठराव करण्यात आला आहे. दरम्यान सदरच्या बैठकीत एकूण १२ जिल्ह्यातील महामार्ग बाधीत शेतकरी सहभागी झाले होते.दरम्यान या परिषदेचे उद्घाटन काॅग्रेस पक्षाचे कोल्हापूरचे खासदार शाहू छत्रपतींच्या हस्ते झाले.दरम्यान सदर कार्यक्रमास यावेळी समरजीत घाडगे देखील उपस्थित होते.