पुणे दिनांक २२ ऑक्टोबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच मुंबई येथून एक राजकीय तसेच खळबळजनक अपडेट हाती आली असून.कुर्ला आणि चुनाभट्टी येथे शिवसेना उध्वव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षाला एक मोठा धक्का दिला आहे.येथील भारतीय जनता पक्षाच्या १ हजार कार्यकर्त्यांनी आज उध्दव ठाकरे यांच्या गटात पक्षप्रवेश केला आहे.सदर पक्षप्रवेश हा उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत झाला आहे.या पक्षप्रवेशा मुळे आता भारतीय जनता पक्षाला मोठे खिंडार पडले आहे.
दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे.आता सगळ्याच पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर इनकमिंग तसेच आऊट गोइंग सुरू आहे.दरम्यान आज मंगळवारी कुर्ला चुनाभट्टी येथील भारतीय जनता पक्षाच्या १ हजार कार्यकर्त्यांनी मातोश्री येथे उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला आहे.त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का आहे.त्यामुळे आजच्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचा उध्दव ठाकरे यांच्या शिवसेना मध्ये पक्षप्रवेशामुळे भारतीय जनता पक्षाला आता चांगलेच खिंडार पडले आहे.दरम्यान आज भारतीय जनता पक्षाचे कुर्ला विधानसभा भाजपाचे महामंत्र्यांसोबत एक हजार कार्यकर्ते यांनी कमळ सोडून मशाल हाती घेतली आहे.दरम्यान हा मतदारसंघ महाविकास आघाडी मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार यांच्या गटाकडे आहे.तर महायुती मध्ये हा मतदारसंघ अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे.तर येथून नवाब मलिक हे विद्यमान आमदार आहेत.तर आता त्यांच्या कन्या सना मलिक या मतदारसंघातून इच्छुक आहेत.