पुण्यातील खेड शिवापूर टोल नाक्यावर इनोव्हा कारमध्ये सापडली ५ कोटींची रक्कम, आमदार शहाजी पाटील रक्कमशी माझा संबंध नाही,दोन गाड्यांमध्ये १५ कोटी एक गाडी पोलिसांनी सोडली खासदार संजय राऊत
पुणे दिनांक २२ ऑक्टोबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच राजकीय वर्तुळातून एक खळबळ जनक अपडेट हाती आली असून.पुणे ते सातारा महामार्गावर पुणे जिल्ह्यातील हाद्दीत खेड शिवापूर टोल नाक्यावर एका इनोव्हा कारमध्ये एकूण ५ कोटी रुपयांची रोकड सापडली आहे.दरम्यान पुणे ग्रामीण 👮 खेड शिवापूर पोलिसांनी सदरची रोकड व इनोव्हा कार जप्त केली आहे.तसेच यातील चार जणांना ताब्यात घेतले आहे.यातील एकजण शासकीय ठेकेदार असल्याची माहिती सूत्रांनद्वारे मिळत आहे.दरम्यान सदरची कार पकडल्यानंतर पोलिसांनी आयकर विभाग व निवडणूक आयोगाच्या अधिका-यांना यांची माहिती दिल्यानंतर आयकर विभागाच्या वतीने सदर रक्कमेचे पुरावे व कागदपत्रे गोळा करण्याचे काम सुरू केले आहे.मात्र ठेकेदार याने ही रक्कम आपली आहे असं सांगितलं आहे.मात्र तो याबाबत सबळ पुरावे देवू शकला नाही.तसेच संबंधित ठेकेदार हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांचा कार्यकर्ता असल्याची माहिती मिळत आहे.दरम्यान एवढी मोठी रक्कम सापडून देखील पोलिस अधिकारी माहिती देण्यास टाळाटाळ करीत आहेत.दरम्यान या प्रकरणी दुसरी कारवाई पोलिसांनी केली असती तर आता प्रर्यत पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी तात्काळ पत्रकार परिषद घेतली असती.असं आता अनेकजण खासगीत बोलत आहेत.दरम्यान या रोकड प्रकरणात पोलिस व आयकर विभाग तसेच निवडणूक आयोगाच्या अधिका-यांवर राजकीय दबाव असल्याची माहिती सूत्रांनद्वारे मिळत आहे.
दरम्यान या प्रकरणी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटाचे सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी म्हटले आहे की ‘…त्या ५ कोटी रुपयांशी माझा काहीही संबंध नाही.सदरची रक्कम माझी व माझ्या कुटूंबातील कुणाचीही नाही.असे स्पष्टीकरण दिले आहे.तसेच या प्रकरणांशी माझा कोणताही प्रकरचा संबंध नाही.तसेच उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे खासदार संजय राऊत यांना सत्ता गेल्यापासून रात्री झोपताना देखील 🌲 झाडी व सकाळी उठल्यावर डोंगर 🗻 दिसतात मला या प्रकरणात बदनाम करण्याचा राऊत यांचा प्रयत्न आहे. दरम्यान अमोल नलावडे हा कार्यकर्ता शेतकरी कामगार संघटनेचा आहे.असा दावा यावेळी आमदार पाटील यांनी केला आहे.दरम्यान पुण्यातील खेड शिवापूर टोल नाक्यावर कार मध्ये सापडलेल्या कार मधील रोकड ही १५ कोटी रुपयांची होती.तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवडणुकीसाठी त्यांच्या आमदारांना ५० कोटी रुपये दिले आहेत.त्यातीलच १५ कोटी रुपयांचा पहिला हप्ता सगळ्या शिवसेना मुख्यमंत्री गटाच्या आमदारांना जात आहे.दरम्यान पुणे येथे जप्त करण्यात आलेले १५ कोटी हे सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांचे होते.तसेच पुणे पोलिसांनी फक्त ५ कोटी रुपये जप्त केले आहेत.तर ज्या कारमध्ये १० कोटी रुपये होते.ती कार सोडून दिली आहे.या टोल नाक्यावर एकूण दोन कार होत्या पण फोन आल्यानंतर एक कार सोडून देण्यात आली आहे.तसेच यावेळी टोल नाक्यावर उध्दव ठाकरे गटाचे शिवसैनिक होते.त्यांच्या दबावामुळेच पुणे ग्रामीण पोलिसांनी फक्त ५ कोटी जप्त करण्यात आले आहे. दरम्यान राज्यातील १५० आमदारांना १५ – १५ कोटी पोहोचले.असा दावा उध्दव ठाकरे गटाचे शिवसेनाचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी गंभीर आरोप केला आहे.तसेच यावेळी बोलताना ते म्हणाले की. निवडणूक निर्णय अधिकारी व पोलिस आमच्या पाकिटामधील पैसे देखील जप्त करतील असे म्हटले आहे.