पुणे दिनांक २२ ऑक्टोबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच एक बंगळुरू येथून अपडेट हाती आली असून.मुसाळधार पावसामुळे निर्माणाधीन एक इमारत कोसळली आहे.या दुर्घटना मध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे.अन्य एकूण १७ कामगार हे इमारती च्या ढिगा-याखाली गाडल्या गेल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.तर अन्य काही कामगार जखमी झाल्याची माहिती सूत्रांनद्वारे मिळत आहे.
दरम्यान तीन जणांचे मृतदेह ढिगा-याखालून काढून त्यांचे शव पोस्टमार्टम करीता शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.तर जखमींना तातडीने उपचारासाठी रूग्णांलयात दाखल करण्यात आले आहे.तर अन्य कामगार हे ढिगा-याखाली गाडल्या आहेत.त्यांना बाहेर काढण्यासाठी युद्ध पातळीवर बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.दरम्यान आज बंगळुरूत अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणावर कोसळत आहे.दरम्यान पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले आहेत.तर अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचले आहे.तसेच ब-याच ठिकाणी विजपुरवठा हा खंडीत झाला आहे.तसेच मुसळधार पावसामुळे बंगळुरू शहरातील वाहतूक व्यवस्था देखील मोठ्या प्रमाणावर कोसळली आहे.तसेच मुसळधार पावसा मुळे शहरात छोट्या मोठ्या दुर्घटना घडत आहेत.